चोपडा शहरात गुटखा विक्रेत्यावर कारवाई; ३०५ प्रतिबंधित पाऊच व १८ तंबाखू पाकिटे जप्त.
चोपडा (दि. १० जुलै) : चोपडा शहर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी शहरातील भाजी मंडी परिसरात छापा टाकून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश कैलास बोहोडे (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फिरोज हुसेन बागवान (वय ३९, रा. लालजीली आबाद चौक, चोपडा) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भाजी मंडीतील फ्रूट सप्लायर्स दुकानासमोर करण्यात आली. छाप्यात खालील प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले :
विमल पान मसाला – ८० पाऊच
कसमचंद पान मसाला – १४० पाऊच
तानसेन पान मसाला – ६७ पाऊच
डी-१ सुगंधित तंबाखू – १८ पाकिटे
अशा प्रकारे एकूण ३०५ गुटखा पाऊच व १८ तंबाखू पाकिटे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमे तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४ व २७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सूर्यवंशी करीत असून, ही कारवाई पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले लेयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.