Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील घरातून दीड कोटींची रोकड, अर्धा किलो सोने जप्त; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची 10 तासांची कार्यवाही!

दुपारी 4 ते मध्यरात्री 1 पर्यंत चालली झाडाझडती !


प्रतिनिधी: अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या लाचलुचपत प्रकरणातील चौकशीदरम्यान जळगावातील त्यांच्या सीलबंद निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तब्बल 10 तास झडती घेत 1 कोटी 53 लाख 630 रुपयांची रोकड, सुमारे अर्धा किलो सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. ही कारवाई दुपारी 4 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत पंचांच्या उपस्थितीत पार पडली. यापूर्वी याच सीलबंद घरात घुसलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली होती. प्राथमिक तपासात हे दोघे किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याचे समोर आले असून, ते कोणाच्या सांगण्यावरून घरात गेले होते, याचा तपास सुरू आहे. संपूर्ण कारवाईदरम्यान परिसरात कडेकोट सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button