Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव बघता; उपमहापौरांची मलेरिया विभागासोबत बैठक घेऊन कडक सूचना दिल्या

फॉग मशीन व कीटकनाशकांची तातडीने खरेदी; उपमहापौरांचा आदेश


  • प्रतिनिधी: दि.19 :  उपमहापौर मनोज चौधरी यांनी जळगाव महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाची एक महत्त्वाची बैठक घेतली. जळगाव शहरात सध्या वाढत असलेला डासांचा प्रादुर्भाव आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत खालील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली आणि उपमहापौरांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या:अडचणींचा आढावा: धूर फवारणी (फॉंगिंग) करताना येत असलेल्या अडचणी त्यांनी मलेरिया विभागाकडून जाणून घेतल्या. साहित्याचा तुटवडा दूर करणे: शहरात सध्या फॉग मशीनचा असलेला तुटवडा, केमिकल आणि आवश्यक कीटकनाशके लवकरात लवकर मागवून घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण: जळगाव शहरात वाढत असलेल्या डासांच्या त्रासापासून नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले.आगामी पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आतापासूनच आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या मोहिमेमुळे जळगाव शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button