Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगाव मध्ये बेकायदेशीर बॅनरचे पेव; प्रतिष्ठित संस्थेची ‘फुकट चमकोगिरी’ उघड


जळगाव (प्रतिनिधी) : शहरात विविध ठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता तसेच जाहिरात कर न भरता बेकायदेशीररीत्या लोखंडी खांब पक्के उभारून मोठमोठे बॅनर लावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले हे खांब आणि त्यावर लावलेले बॅनर केवळ नियमबाह्यच नसून नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करत आहेत.

विशेष म्हणजे, संबंधितांकडून महापालिकेचा जाहिरात कर टाळला जात असून, कोणतीही अधिकृत नोंद किंवा परवानगी न घेता ‘फुकट चमकोगिरी’ करण्यासाठी अशा बॅनरचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी तर रस्त्याच्या कडेला, पदपथावर किंवा सार्वजनिक जागेत खांब उभारून जाहिरात फलक उभारले गेले आहेत, ज्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे.

सदरील बॅनर हे ज्या संस्थेमार्फत लावण्यात आलेले आहेत, त्या संस्थेचे राज्यभरात मोठे नाव असून अशा प्रतिष्ठित संस्थेकडून नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर बॅनर लावणे हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

यामुळे महापालिकेने तातडीने अशा बेकायदेशीर बॅनर व लोखंडी खांबांवर कारवाई करून ते हटवावेत, तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहराची सौंदर्य आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी या संस्थेकडून तसेच शिक्षकांकडून काय बोध घ्यायला पाहिजे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button