Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

आईशी सतत बोलणे अल्पवयीन आरोपीला खटकले; ३५ वर्षीय तरुणाचा खून


  • भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहरातील पाटील मळा परिसरात ३५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. भुसावळ, जि. जळगाव) हे रेल्वे कँटीनमध्ये कार्यरत होते. तुषार सोनवणे यांचे आरोपीच्या आईसोबत सातत्याने बोलणे अल्पवयीन आरोपीला पसंत नव्हते. याच कारणातून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या वादातून पाटील मळा परिसरात तुषार सोनवणे यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोनवणे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याची परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली असून, बाजारपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button