ताज्या बातम्या

रामानंद नगर पोलिसांची मोठी कामगिरी; धुळे येथील घरफोडीतील फरार आरोपींना पकडले

जळगाव पोलिसांची अचूक माहिती; धुळेतील घरफोडीचे आरोपी अखेर गजाआड


प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना जळगावच्या रामानंद नगर पोलिसांनी कौशल्यपूर्ण कारवाई करत अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना देवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी देवपूर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक १९५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत चोरट्यांनी ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १९ भार चांदीचे दागिने लंपास केले होते.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे आणि सुशील चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार जळगाव शहरातील राजीव गांधी नगर परिसरातील राहुल सतीश लोंढे (वय २०) आणि ओम भरत लोंढे (वय १८) हे दोघेही घरफोडीप्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

माहितीची खातरजमा होताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना पुढील तपासासाठी देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राऊत यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी आणि अतुल चौधरी यांनी पार पाडली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button