ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे १५ मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

“रोजगाराची सुवर्णसंधी – प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन” नामांकित कंपन्यांसोबत थेट मुलाखती


  1. जळगाव, दि. 11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव या कार्यालयामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड जिल्हा जळगाव, या ठिकाणी दि. १५ मे, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये क्वेस क्रोप प्रा. लि. पुणे व युवाशक्ती फाउंडेशन, जळगाव. या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

या मेळाव्यास १० वी, १२वी, ITI, बी.कॉम., एम.कॉम., ग्रॅज्युएट तसेच इतर पात्रता धारक उमेदवार सहभागी होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या महा स्वयंरोजगार व रोजगार पोर्टल या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेली असल्यास आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग-इन करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. ज्या उमेदवारांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नाही त्यांनीही सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात काही अडचण असल्यास अथवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button