ताज्या बातम्या

महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर टीका; ३३% महिला आरक्षणाला विरोधकांवर जळगाव महापौरांचा संतप्त सवाल!

महिला सक्षमीकरणाच्या विधेयकावरून राजकीय वाद; महापौरांचा इशारा


जळगाव : संसदेत १६ व १७ एप्रिल रोजी महिलांच्या ३३ टक्के आरक्षणासह महत्त्वाच्या विधेयकांना विरोध केल्याबद्दल काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीएमसी व डीएमके यांच्यावर महापौर दीपमाला काळे यांनी पत्रकार परिषदेत तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, हा विरोध केवळ राजकीय नसून देशातील निम्म्या लोकसंख्येच्या हक्कांवर घाला असून महिलांविरोधी मानसिकतेचे स्पष्ट उदाहरण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना धोरणनिर्मितीत समान सहभाग देणे हा त्यांचा नैसर्गिक हक्क असल्याचे अधोरेखित केले असून, महिलांचे सक्षमीकरण हे देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, असे काळे यांनी सांगितले.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारसंघ पुनर्रचनेबाबत कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीत विलंब सहन केला जाणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी इशारा दिला की, योग्य तो निर्णय लवकर न झाल्यास महिलांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल. असेही महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button