Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगाव आजपासून पासून आंबा महोत्सव सुरू, जगातील 160 प्रजातींचे आंब्यांचा समावेश , शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या दालनात प्रदर्शन !

जगातील सर्वात प्रसिद्ध व महागडा मियाझाकी आंब्याचा या प्रदर्शनात समावेश! हे प्रदर्शन 8 मे व 9 मे पर्यंत सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत.


जळगाव, दि. ७ मे : जैन हिल्स परिसरात लागवड करण्यात आलेल्या विविध दुर्मीळ व नामांकित आंब्यांच्या जातींचे भव्य प्रदर्शन ‘मॅंगो फिएस्टा-२०२६’ चे उद्घाटन बुधवारी शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या दालनात उत्साहात पार पडले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

यावेळी दिल्ली येथील इंडियन पोटॅश लिमिटेडचे जनरल मॅनेजर यू. एन. सिंग, स्वरुप लुंकड, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, अतुल जैन, ज्योती जैन, शोभना जैन, अंबिका जैन, अन्मय जैन तसेच डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. के. बी. पाटील, डॉ. निर्मल बाबू, बी. डी. जडे, शंकर गाडेकर, नितीन पाटील, अजय काळे यांच्यासह जैन परिवारातील सदस्य व सहकारी उपस्थित होते. प्रारंभी अशोक जैन व ज्योती जैन यांच्या हस्ते आंबावृक्षाचे पूजन करण्यात आले.

‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शन ८ आणि ९ मे रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. जैन इरिगेशनच्या शेती संशोधन व विकास प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आयोजित या प्रदर्शनामध्ये भारतासह विविध देशांतील १६० हून अधिक आंब्यांच्या प्रजाती मांडण्यात आल्या आहेत.

यामध्ये जैन इरिगेशनने विकसित केलेल्या टिश्यूकल्चरच्या १३ जाती, जैन संकरित (हायब्रीड) ४९ जाती तसेच थायलंड, मेक्सिको, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, ब्राझील आणि इस्त्राईल येथील विविध विदेशी आंब्यांच्या जातींचा समावेश आहे. विशेष आकर्षण ठरलेला जगातील सर्वात महागडा मानला जाणारा ‘मियाझाकी’ आंबाही प्रदर्शनात पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

प्रदर्शनाचे मुख्यद्वार आंब्याच्या भव्य कलाकृतीने सजविण्यात आले असून, दुर्मीळ व चविष्ट आंब्यांच्या विविध जाती एकाच छताखाली पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. महाराष्ट्रासह देशभरात अशा प्रकारचे प्रदर्शन प्रथमच भरविण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

‘मॅंगो फिएस्टा-२०२६’ ला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button