Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

विद्यार्थ्यांनी सादर केले कलाविष्कार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘समन्वय २०२६’चा समारोप

आर्ट गॅलरीपासून डीजे नाईटपर्यंत ‘समन्वय २०२६’ने दिला मनोरंजनाचा उत्सव.


जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस आग्नेय बॅचतर्फे दि. १२ ते १८ एप्रिलदरम्यान आयोजित ‘समन्वय २०२६’ सप्ताहाचा समारोप उत्साहात पार पडला. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.

दि. १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. तसेच टीचर डे, प्रोमो आणि डीजे नाईटसारख्या विविध उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली.

समारोप प्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, अनिल पाटील, किवा पाटील, सारा पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित तसेच रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी धन्वंतरी पूजन व स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमात भरतनाट्यम, कथ्थक, पंजाबी, राजस्थानी, दक्षिण भारतीय, लावणी, हिप-हॉप, फ्यूजन आणि बॉलिवूड नृत्यप्रकार सादर करण्यात आले. तसेच गायन, जॅमिंग सेशन, रेट्रो बॉलिवूड सादरीकरण, स्किट्स यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी स्पोर्ट्स ट्रॉफीचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तल्हा जमादार, राजनंदिनी पाटील, अंजली महाजन व साक्षी पिसे यांनी केले. तर वैष्णवी वानखेडे, ओंकार शेलार, कल्याणी चौधरी, अपूर्व पाटील, मुस्कान सिद्दीकी, रुत्विक भुजबळ, वेदांत काकडे, अंजली गुप्ता, चेतन माळी, विराज पाटील व सृष्टी माहुलकर यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button