गुरुदेव संत बलजित सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसोली येथे सत्संग, भजनसुमिरन व रक्तदान शिबिराचे आयोजन.

प्रतिनिधी जळगाव, ता. ९ नोव्हें: —विश्व मानव रुहानी केंद्र नवानगर शाखा शिरसोली यांच्या वतीने गुरुदेव संत बलजित सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी विश्व मानव रुहानी केंद्र, शाखा शिरसोली (प्र.बो.) येथे होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० ते ११ भजनगायनाने होईल. त्यानंतर ११ ते १२ या वेळेत संत बलजित सिंहजी महाराज यांचा कॅसेटद्वारे प्रवचन, १२ ते १ भजन सुमिरन आणि १ ते २.३० या वेळेत लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून सर्व गुरुप्रेमी संगत व समाजबंधूंनी या सत्संग व सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्व मानव रुहानी केंद्र नवानगर शाखेच्या सेवकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :भिकन सुरेश चौधरी —मोबाईल: ९६८९३९१०६९ (सदस्य, विश्व मानव रुहानी केंद्र शाखा शिरसोली, ता. जळगाव)