निमखेडी रोडवरील अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित देहविक्री रॅकेटवर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी:जळगाव शहरात पुन्हा एकदा अनैतिक व्यवसायाचा मुद्दा चर्चेत आला असून, जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील निमखेडी रोड परिसरात असलेल्या ब्रम्हांड नायक अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित देहविक्री रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अपार्टमेंटमध्ये अनेक दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला. या कारवाईदरम्यान काही संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. संबंधित ठिकाणाहून काही महत्त्वाचे पुरावे आणि साहित्यही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, निमखेडी रोडसारख्या रहिवासी भागात अशा प्रकारचे रॅकेट सुरू असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाकडून आता या संपूर्ण नेटवर्कचा तपास अधिक व्यापक पद्धतीने केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.