ताज्या बातम्या

समाजजागृतीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात रील्स निर्मात्यांची बैठक

फेटल अपघात ते पॉस्को, सायबर व महिला गुन्ह्यांवर —जागृतीसाठी रील्स बनवण्याचे आवाहन


प्रतिनिधी जळगाव : समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी आज एसपी कार्यालयात सोशल मीडिया रील्स बनविणाऱ्या तरुण-तरुणींची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. डिजिटल माध्यमांचा प्रभाव लक्षात घेता, जनजागृतीसाठी रील्स हा प्रभावी मार्ग ठरू शकतो, या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत उपस्थित रील्स निर्मात्यांना समाजहिताच्या महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ तयार करण्याचे आवाहन करण्यात आले. विशेषतः फेटल अपघात, पॉस्को कायदा, सायबर गुन्हे तसेच महिलांविषयक गुन्हे या संवेदनशील विषयांवर माहितीपूर्ण व जागरूकता निर्माण करणारे रील्स तयार करण्याची सूचना देण्यात आली.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, आजच्या तरुण पिढीवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे योग्य संदेश योग्य पद्धतीने पोहोचवण्यासाठी कंटेंट क्रिएटर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता वाढवणे, गुन्हे टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे संदेश देणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या बैठकीसाठी उपस्थित असलेले रील्स निर्माते पुढीलप्रमाणे : अमित माळी, संदिपक तायडे, सुरेश राजपूत, समृद्धी पाटील, तन्वी पांडव, भाग्यश्री पाटील, याशिका किनाडा, तेजस्विनी अजय देशमुख, अक्षय नेहे, पवन भोई, आदित्य संभाजी पाटील, ऋषिकेश पवार, हरीदास काशीनाथ बोंडे, अजय कुमावत, महेश सुमे, निवृत्ती इंगळे आदींचा समावेश होता.

या उपक्रमामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button