ताज्या बातम्या

जळगावात PWD मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; १५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना शाखा अभियंता रंगेहाथ पकडला


जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) लाचखोरीचा मोठा प्रकार समोर आला आहे. येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी एका ठेकेदाराकडून बिल काढून देण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली होती. ठेकेदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार शनिवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना योगेश अहिरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून या विभागात होत असलेल्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button