राजकारणCrimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ स्पर्धेची घोषणा.संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी ही माहिती दिली.

आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा " क्रिकेटप्रेमींसाठी सुवर्णमौका;


जळगाव : शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ चे भव्य आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केली. यावेळी अड. सुरज जहागिर, उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे आणि खजिनदार राजेंद्र लढ्ढा उपस्थित होते.

ही स्पर्धा मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस क्रीडांगणावर आयोजित करण्यात येणार आहे. टी-20 स्वरूपात होणारी ही लीग आयपीएलच्या धर्तीवर खेळवली जाणार असल्याने जळगावकरांना मोठ्या स्पर्धेचा अनुभव स्थानिक पातळीवर मिळणार आहे. मैदानावर रंगीत कपड्यांमध्ये खेळाडू उतरतील तसेच पांढऱ्या लेदर बॉलचा वापर केला जाणार आहे. दिवस-रात्र सामनेही या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे.

“Own The Game, Lead The League, Build Legacy” या घोषवाक्याखाली होणारी ही लीग जळगावसह संपूर्ण खान्देशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी देणार आहे. स्थानिक खेळाडूंना व्यावसायिक पातळीवर खेळण्याचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या स्पर्धेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा क्रिकेटचा उत्साह निर्माण होणार असून प्रेक्षकांनाही रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. जळगाव क्रिकेट लीग ही केवळ स्पर्धा नसून शहरासाठी एक क्रीडा उत्सव ठरणार असल्याचेही अतुल जैन यांनी सांगितले.

संघटनेच्या माहितीनुसार, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून जाहीर करण्यात आलेल्या खेळाडूंनाच नोंदणी केल्यानंतर खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी वेळेत नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button