ताज्या बातम्या

मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्यावर रंगली जंगी पार्टी !

अधिकाऱ्यांसह पत्रकार सुद्धा झिंगाट.....


जळगाव :  जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची नुकतीच उचलबांगडी होत बदली झाली. ११ जून गुरुवारी सायंकाळी नूतन आयुक्त आदित्य जीवने यांना पदभार सोपवला. त्यानंतर औपचारिक निरोप समारंभ झाल्यावर ते महापालिकेच्या शासकीय बंगल्यावर गेले त्या ठिकाणी त्यांच्यासह महापालिकेचे काही अधिकारी व पत्रकार यांची जंगी पार्टी झाली. चिकन मटन वर ताव मारला गेला, या पार्टीत अधिकाऱ्यांसह पत्रकार देखील टल्ली झाले होते. 

ही बातमी काही जागरूक पत्रकारांना माहिती पडल्याने त्यांनी तातडीने आयुक्त बंगल्यावर धाव घेत बंगल्यावर सुरू असलेल्या पार्टीचे व्हिडिओ चित्रीकरण केले. सदर पत्रकार व्हिडिओ चित्रीकरण करत असताना पार्टीत रंगलेल्या अधिकारी व पत्रकारांना आपले कोणीतरी व्हिडिओ चित्रीकरण करत आहे. याचे सुद्धा भान यांना नव्हते.

जनतेचे नोकर असलेले आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी देखील सर्व सीमा पार केल्या असून चक्क शासकीय बंगल्यावर अशा पद्धतीने पार्टी देऊन अक्षरशः उन्माद केला आहे. आयुक्त ढेरे यांनी प्रशासक असताना जळगावचा काय विकास केला हे सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना चांगलेच माहित झाले आहे. जनतेच्या टॅक्स मधून पगार घेणाऱ्या आयुक्त ढेरे यांना ही गोष्ट शोभते का? शासकीय बंगला, शासकीय अधिकारी, शासकीय वाहन, ही आपली खाजगी मालमत्ता असते का? बंगल्यावर झालेल्या पार्टीची सखोल चौकशी होणार का ? महापौर दीपमाला काळे शासनाला कारवाईसाठी पत्र देणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रात्री साडे बाराच्या दरम्यान पार्टी आटोपत बंगल्याच्या बाहेर येत असताना प्रत्येकजण झिंगाट झालेला दिसत होता. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे काही पत्रकारांची या पार्टीतील खास उपस्थिती. जे पत्रकार प्रशासनावर प्रश्न विचारण्याचे काम करतात, तेच जर अधिकाऱ्यांच्या “खास मेजवान्यांमध्ये” सहभागी होत असतील, तर उद्या प्रशासनाविरोधातील बातम्या कितपत निष्पक्ष असतील? “अशा पत्रकारांकडून जनतेला न्याय मिळेल का ? असाही प्रश्न उपस्थित होतो.

जनतेच्या करातून बांधलेल्या अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या पार्टी मुळे महापालिका प्रशासनाची प्रतिमा धुळीस गेल्याची भावना काही कर्मचारी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. तसेच पार्टीत रंगलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button