राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष इंजि. मोनालिका पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा
भोकर, ता. अमळनेर (प्रतिनिधी) – पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष इंजि. मोनालिका पवार यांच्या २६ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भोकर येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात २६ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या धर्मपत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा अमळनेर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाची गरज अधोरेखित केली. वाढदिवसासारखे वैयक्तिक आनंदाचे क्षण समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरे केल्यास त्यातून सकारात्मक संदेश समाजात पोहोचतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास भोकर गावातील राजेंद्र डिंगबर पवार, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, अशोक पाटील, श्रीराम आबा पाटील, डॉ. अमोल भालेराव, किशोर पवार, मुख्याध्यापक सुकदेव पाटील, दीपाली राजपूत, प्रभाकर सोनवणे, सुकदेव बाविस्कर, लोटण सोनवणे, योगेश कोळी, विलास सोनवणे, धनराज वारडे, सुरेश जगन्नाथ पवार, बाविस्कर सिस्टर, आशा सेविका भाग्येश्री सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. पर्यावरण रक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला. इंजि. मोनालिका पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.