जळगाव शहरातील मुकुंद नगर केंद्रात स्वामी पुण्यतिथी सप्ताह सांगता निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..
जळगाव प्रतिनिधी दि.२६/०४/२०१५ शनिवार रोजी हरीविठ्ठल नगर परीसरातील मुकुंद नगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जळगाव जिल्हा शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त महिला व पुरुषांसाठी मोफत आरोग्य तपासणी रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यासाठी वैद्य डॉ.सौ वर्षा गणेश बारी यांच्या समवेत सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर पांढरे यांनी सहभागी होऊन रुग्ण तपासणी केली या शिबिरासाठी आयुष्य संचालक व अधिष्ठाता डॉ. रामन घुंगराळेकर सर यांचे मार्गदर्शन व प्रभारी अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.इतर स्टाफ त्यांनी महिलांची व पुरुषांची तपासणी करून मोफत औषधी दिल्यात . या शिबिरामध्ये केंद्रातील व परिसरातील १०० महिला व ५० पुरुषांनी आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला. याचबरोबर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नामजप यज्ञ सप्ताह निमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताहाची सांगता सकाळी १०.३०च्या महानैवेद्य आरती करुन दिंडोरी प्रणित मार्गातील १८ विभागाची सखोल मार्गदर्शन श्री अनिल बारी यांनी केले तसेच केंद्राच्या माध्यमातून पुढील कार्यक्रमाचे देखील वाचन व स्वतःच्या झालेल्या सेवेचे वाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्त व केंद्रातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण अखंड नाम जप यज्ञ सप्ताह यशस्वी होण्यासाठी केंद्र प्रतिनिधी रवींद्र पाटील यांच्यासह केंद्रातील सर्व विभागातील प्रतिनिधी सर्व सेवेकरी महिला पुरुष यांनी अनमोल असे सहकार्य करून कार्यक्रम व सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.