वंचीतचे उमेदवार ललित घोगले यांचा शिवाजी नगर हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात.
वंचीतचे उमेदवार ललित घोगले यांचा शिवाजी नगर हनुमान मंदिर येथील आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात.
जेष्ठाकडून आशीर्वाद महिलांकडून ओक्षण.
जळगाव शहर विधानसभा वंचीत बहुजन आघाडीचे उमदेवार ललित घोगले यांनी आज शिवाजी नगर येथील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी परिसरातील ठीकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. अबकी बार ललित भाऊ आमदार, ललित भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो अश्या घोषणा देण्यात आल्या. शिवाजी नगर हुडको येथील बुद्धिविहार येथे पुष्पहार अर्पण केल्यानंतर ठिकठिकाणी ललित घोगले यांचे महिलांनी ओक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी, जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार हभप राष्ट्रीय समाज प्रबोधनकार माईसाहेबराजे पाटील, डीगंबर सोनवणे, राहुल सुरवाडे, सुजाता ठाकूर, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.