ताज्या बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये लक्षवेधी पक्षप्रवेश केलेल्या व्यक्ती बद्दल ,जमील देशपांडे, जळगाव जिल्हाध्यक्ष मनसे, यांच्या शब्दात Loktime न्यूज ला आलेले पत्र…


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये लक्षवेधी पक्षप्रवेश केलेल्या व्यक्ती बद्दल ,जमील देशपांडे, जळगाव जिल्हाध्यक्ष मनसे, यांच्या शब्दात Loktime न्यूज ला आलेले पत्र…

जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात काल रात्री एका खासगी कारचा अपघात होतो अपघात ग्रस्त कारच्या काच काचेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सिम्बॉल दिसतो व त्या रस्त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव उपशहरअध्यक्ष चेतन पवार लगेच थांबतात.

कारच्या काचेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सिम्बॉल आहे. म्हणजेच हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी, पदाधिकारी, किंवा मनसैनिक असतील म्हणून चेतन पवार आस्थेवाईकपणे थांबून विचारपूस करतात, कुठल्या प्रकारची मदत हवी आहे का याची चौकशी करतात.

सुदैवाची बाब अशी की कारमध्ये

मध्ये बसलेल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही याची खात्री करतात व काही मदत लागते आहे का अशी चौकशी करून आपला मोबाईल नंबर देऊन त्या ठिकाणाहून आपल्या कामाला निघून जातात.

कार मध्ये बसलेले कुटुंब दुसऱ्या मित्राच्या कार मध्ये बसवून कार मालक अपघातात झालेल्या नुकसान बाबत अरे सर पोलिसांना कळवतात हा झाला पहिला भाग.

दुसऱ्या दिवशी कार मालक चेतन पवार यांना संपर्क करतात व आपली भेट करायची आहे. आपल्या वरिष्ठांना भेटायचं आहे असा आग्रह करतात.

त्यांच्या आग्रहाप्रमाणे चेतन पवार त्यांना माझ्या कार्यालयात घेऊन येतात व त्या ठिकाणी चर्चा होते महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या पदाधिकाऱ्याने केलेल्या मदतीची.

कार मालक हे जरी मनसेत नसले तरी महाराष्ट्र नवनिर्माण *सेनेचे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांचे खूप मोठे फॅन आहेत.*

त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सिम्बॉल त्यांच्या गाडीवर गेल्या सात-आठ वर्षांपासून लावलेला आहे. फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सिम्बॉल बघून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी थांबतो आणि मदत करतो हा क्षण अतिशय भावुक करणारा होता असे कार मालक सांगतात.

एका कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर असलेले कारमालक हे बिल्डर व्यवसाय सुद्धा सक्रिय आहेत.

त्यांच्या कंपनीचे नाशिक पासून मराठवाड्यापर्यंतची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

माननीय राजसाहेब ठाकरे* यांच्या व्यक्तिमत्त्वावर अगदी मनापासून प्रेम करणारे कार मालक यांना मी विनंती केली की आपण सन्माननीय राज साहेब यांच्या पक्षामध्ये काम करावे.

क्षणाचाही विलंब न करता कारमालक यांनी होकार दर्शवला. त्याच क्षणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सिम्बॉल असलेला पटका कारमालक यांच्या गळ्यात मी उत्साहाने टाकला व छोटेखानी पक्ष प्रवेश करून घेतला.

चेतन पवार यांची एक छोटीशी मदत करणारी छोटी कृती किती मोठं काम करून जाऊ शकते व किती चांगल्या माणसांना पक्षासोबत जोडू शकते याची प्रचिती या माध्यमातून आली.

मित्रांनो या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला चिखल बघता सर्वसामान्यांच्या मनामध्ये *माननीय राजसाहेब ठाकरे* हेच एकमेव नाव आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक वेगळी ओळख निर्माण करेल याची पूर्ण खात्री झाली.

तुम्ही उत्सुक असाल ज्यांनी प्रवेश केला त्यांचं काय नाव..?

होय कार मालक आहेत ,

*श्री.अमोल पाटील रा.जळगाव*

धन्यवाद पाटील साहेब आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबत मनाने होताच व आता कार्याने सुद्धा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी झाला याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जिल्ह्यातर्फे आपले हार्दिक स्वागत.

सामाजिक बांधिलकी म्हणून

चेतन पवार यांनी जे मदत कार्य केलं त्यांचे पण दिलसे मनसे मनापासून आभार..

जमील देशपांडे ,जिल्हाध्यक्ष मनसे, जळगांव


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button