ताज्या बातम्या
जळगावात हरिविठ्ठ्ल नगरात जुगार अड्ड्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ९ जण ताब्यात, ३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्याच्या आदेशानुसार, स्थानीक गुन्हे शाखेने रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील हरीविठ्ठल नगर भागात जुगार अड्ड्यावर धाड टाकली.
८ ऑगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजता झालेल्या या कारवाईत ९ आरोपींना ताब्यात घेतले असून, रोख रक्कम, मोटारसायकल, मोबाईल असे एकूण ३,१४,३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास रामानंद नगर पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली, पीएसआय शरद बागल व त्यांच्या पथकाने केली.