ताज्या बातम्या

बोलावा विठ्ठल”मध्ये चिमुकल्यांच्या सादरीकरणातून माऊलीचे दर्शन


Loktime  news: स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लहान माऊलींसाठी बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाचे आयोजन करित असते. आज झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमात रिंगण.. ज्ञानबा माऊलीचा गरज.. पाऊली.. यातुन वारीची अनुभूती चिमुकल्यांनी करून दिली.

कांताई सभागृहात झालेल्या बोलवा विठ्ठल कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाव्दारे उद्घाटन झाले. याप्रसंगी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ.निशा जैन, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ. विवेकानंद कुळकर्णी, उपाध्यक्षा दीपका चांदोरकर, दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमात अनुभूती स्कूल, ए.टी. झांबरे विद्यालय, विवेकानंद प्रतिष्ठान, सेंट जोसेफ स्कूल, व ओरियन सीबीएससी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रिंगण

पंढरपूराची वारी म्हटले म्हणजे रिंगण आलेच. हे रिंगण पांडुरंग व भक्तांचा असिम आनंदाचा क्षण. तुळशीचा कलश..टाळ मृदृंग आणि ढोल ताशाच्या गजरात पाऊली, फुगडी खेळून रिंगण अनुभूती स्कूलच्या चिमुकल्यांनी केले. छोटेखानी वारीत विविध खेळ सादर केले.

सुरांव्दारे अनुभवली पंढरीची वारी

बोलावा विठ्ठल मध्ये सुरांनी पंढरीची वारी अनुभवली.

त्यात ज्ञानबा तुकाराम …विठूचा गजर हरीनामाचा गजर. वरूण नेवे व भूषण खैरनार यांनी सादर केला.

त्यानंतर विठ्ठलाची आरती झाली. विठ्ठल नामाची शाळा भरली.. पाऊले चालती…एकतारी संगे…देव माझा विठू सावळा…खेळ मांडीयेला…चल गं सखे पंढरीला…वेढा वेढा रे पंढरी…कानडा राजा पंढरीचा….पांडुरंग नामी लागलासे ध्यास…तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल….बोलावा विठ्ठल… आणि अबीर गुलाल ने समारोप झाला. निरजा वाणी, मृणाली सूर्यवंशी, आराध्य खैरनार, भुमिका चौधरी, कुणाल पारे, काव्य पवार, पियूष नेवे, आदित्य देशपांडे, विभावरी परदेशी, ऐश्वर्या परदेशी या कलावंतांनी सुरांनी वातावरण भक्तीमय केले.तर डाॕ अपर्णा भट प्रभाकर कला संगीत अकादमी च्या विद्यार्थिनींनी ‘चंद्र भागेच्या तीरी… अवघे गर्जे पंढरपूर…’ या अभंगावर कथक नृत्याची प्रस्तुती करून बोलवा विठ्ठल कार्यक्रमाची सांगता केली. संगीतमय वारीचे निरूपण ओवी धानोरकर हिने केले. तर तबल्याची संगत सर्वेश चौक तर संवादिनीची साथ शौनक दीक्षित व भूषण खैरनार यांनी केले. कार्यक्रमाची यशस्वीतासाठी नुपूर चांदोरकर- खटावकर, वरूण देशपांडे, स्निग्धा कुलकर्णी, जुईली कलभंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी गुरूवंदना सादर केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button