जळगाव येथील ऐतिहासिक मेहरूण तलावाला “गुरू गोरक्षनाथ सागर” नामकरणाची मागणी
प्रतिनिधी: जळगावातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मेहरूण तलावाला “गुरू गोरक्षनाथ सागर” असे अधिकृत नामकरण करण्याची मागणी नाथ संप्रदाय प्रगती जनसेवा बहुउद्देशीय संस्था, जळगाव तर्फे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
ॲड. गजानन पांडुरंग जाधव यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, १२ व्या शतकात नवनाथ पंथाचे गुरु गोरक्षनाथ यांनी शेकडो शिष्यांच्या सहकार्याने मौजे मेहरूण येथे पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी हा तलाव खोदला. त्याचा उल्लेख अमर संवाद, नवनाथ पढे तसेच “गिरणाई” स्मरणग्रंथात (पृष्ठ ३८) स्पष्टपणे आढळतो.
इतिहासानुसार, १५ व्या शतकात या परिसरात वसाहत झाली आणि गावाच्या नावावरून हा तलाव “मेहरूण तलाव” म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र, हा तलाव प्रत्यक्षात नवनाथ पंथाशी निगडित धार्मिक वारसा स्थळ असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. संत साहित्य व ज्ञानदेव हरीपाठातील ८ व्या अभंगातही नाथ पंथ गुरुपरंपरेचा उल्लेख असल्याचे ॲड. जाधव यांनी अधोरेखित केले.
संस्थेच्या मते, नामकरण झाल्यास जळगावचा ऐतिहासिक वारसा अधोरेखित होईल तसेच २०२६-२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक पर्यटन, स्थानिक व्यापार आणि महसूल वाढीस चालना मिळेल. आवश्यक असल्यास तलावाचा इतिहास सिद्ध करणारे पुरावे सादर करण्याची तयारी असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
२)अखिल महाराष्ट्र नाथाबाबा समाज देवा मंडळ जळगाव व
३) शिव गोरक्षनाथ व्यवस्थापन समिती, हातुर्णा ता. भातकुली-जि.अमरावती
३) नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्था नाशिक ता जि. नाशिक –
४) श्री. गोरक्षनाथ स्मशानभूमी इष्ट ता. सिन्नर जि. नाशिक
५) भारतीय भटके विमुक्त आदिवासी संघ ओबीसी संघर्ष महासंघ, संभाजी नगर यांचे तर्फे- श्री. रुपचंह रघुनाथ कासार ( पत्रकार) जळगांव ,श्री -योगी पुंडलीकनाथ गुरु बालकनाथ बारापंथ श्री योगी विठ्ठल नाथ आनंदनाथ बारापंथ.श्री श्री. एकनाथ काशिनाथ नाथ – नशिराबाद,श्री शाम जगन्नाथ शिंदे – जळगाव ॲड, गजानन चांडुरंग जाधव – नाशिक यांच सहकार्य लाभले.