अखेर दारूने भरलेला ट्रकवर कारवाई करून ट्रक रवाना : वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई
15 RCP कर्मचाऱ्यांनी रात्रभर दिला ट्रक जवळ पहारा.
सोमवारी शहरातील इच्छा देवी चौकात दुपारी 3 वाजता मोठी कारवाई उघडकीस आली. देशी दारूचे बॉक्स भरलेला ट्रक (MH 15 EG 6253) महिला वाहतूक पोलीस वैशाली पाटील यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला. सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना दिसताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. प्रथमतः ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने ट्रक महामार्गाच्या साईडला नेऊन उभा केला. ट्रक चालकाची विचारपूस केली असता त्याने मद्यपान केलेले आढळले यानंतर अतिरिक्त वाहतूक पोलिसांना बोलावून ट्रक चालकाची चौकशी करून ट्रक वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आला.
सायंकाळी पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार आरसीपी पथकातील 15 कर्मचाऱ्यांनी रात्रभर ट्रकवर कडक पहारा दिला. कारण या ट्रक मध्ये 21 लाख 90 हजार रुपये किमतीच्या टॅंगो ब्रँडच्या देशी दारूचे खोके होते .मंगळवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकच्या दाखल कागदपत्रांची पडताळणी केली असता योग्य आढळले
त्यानंतर ट्रक चालकास ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणी न्यायालयाने 10,000 रुपये दंड ठोठावला, तसेच वाहतूक शाखेचा मागील थकीत दंड 6,000, असा एकूण मिळून 16,000 रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही संपूर्ण कारवाई शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस धनराज बडगुजर आणि दीपक पाटील यांनी अंमलात आणली.
वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला असून शहरवासीयांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मात्र इच्छा देवी चौक हा मोठा असून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी किमान दोन वाहतूक पोलिसांची गरज आहे हे वरिष्ठांनी लक्षात घ्यायला हवे.