ताज्या बातम्या

जळगाव आशा सेविकांचे मानधन व प्रशिक्षण प्रलंबित, आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी उपायुक्तांना दिले निवेदन


जळगाव प्रतिनिधी :जळगाव शहरातील आशा सेविकांचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर होत असल्याचे समोर आले आहे.

जळगाव कार्यक्षेत्रात एकूण 227 आशा कार्यकर्त्या आहेत. यापैकी 96 महिला आरोग्य समित्या स्थापन झालेल्या असून उर्वरित 131 समित्या अद्याप प्रलंबित आहेत. समित्या न झाल्याने अनेक आशांचे मानधन कमी होत आहे. तसेच नव्याने निवड झालेल्या 89 आशा सेविकांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले नसल्याने त्यांच्या मानधनावरही परिणाम होत आहे.

याशिवाय, सर्व आशांना UHND सभेचे मानधन देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे जून महिन्यापासून तर राज्य शासनाचे जुलैपासून मानधन थकीत आहे. त्यामुळे आशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

एप्रिल 2024 मध्ये पूर्ण झालेले मूलभूत व एचबीएनसी प्रशिक्षणाचे भत्ते अद्याप मिळालेले नाहीत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, सीबॅक फॉर्म, क्षयरोग सर्वेक्षणातील स्कूटम कलेक्शन, ACF सर्वेक्षण, कुष्ठरोग सर्वेक्षण यांचे मानधनही थकीत आहे. “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काम केलेल्या आशांना देखील मोबदला मिळालेला नाही.

तसेच गरोदर मातांसाठी माता-बाल संगोपन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही आशांनी केली आहे.

याबाबत तातडीने कार्यवाही करून थकीत मानधन व भत्ते अदा करावेत, अशी आशा सेविकांची मागणी आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button