जळगाव येथील नूतन मराठा महा विद्यालयातील कृष्णा कैलास पाटील यांनी सिक्कीममधील तिबेट सीमेपासून जवळच असलेल्या यामथांग व्हॅली पर्वत शिखरावर (१७.३३५ फूट उंचीवर) यशस्वी केली चढाई
जळगाव प्रतिनिधी: शहरातील कॅडेट कृष्णा पाटील यांनी पर्वतावरील 17000 फूट याच्यावर केली मात.
माजी आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ झाला सत्कार .जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालय एनसीसी विभागातील कॅडेट कृष्णा कैलास पाटील यांनी सिक्कीममधील तिबेट सीमेपासून जवळच असलेल्या यामथांग व्हॅली पर्वत शिखरावर (१७.३३५ फूट उंचीवर) यशस्वी चढाई केली. ही मोहीम एनसीसी १८ महाराष्ट्र बीएनएनसीसीतर्फे २८ बेसिक माउंटेनियरिंग कोर्सअंतर्गत करण्यात आली.
३ मे २०२५ रोजी सकाळी ११:३०वाजता त्यांनी ही मोहीम फत्ते केली. शिखराच्या चढाईदरम्यान त्यांनी थंड हवामान, ऑक्सिजनची कमतरता आणि खडतर भूगोल अशा अनेक अडचणींवर मात केली. त्यांच्या सोबतील त्यांचे मित्र या मोहिमेसाठी त्यांना नूतन मराठा महाविद्यालयातील एनसीसी अधिकारी एस पी शिवराज पाटील यांनी प्रेरित केले. या यशाबद्दल 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी विभागातील वरिष्ठ अधिकारी .
कर्नल अश्विन वैद्य .. यांनी स्वागत केले या वेळी अशोक लाडवंजारी , रिंकू चौधरी , किरण राजपूत , सौ कलाताई शिरसाट , डॉ संग्रामसिंह सुर्यवंशी , डॉ रिजवान खाटीक , इब्राहिम तडवी सर , सुनिल भैय्या माळी , दिपकआबा पाटील बोदवड , चेतन पवार , आकाश हिवाळे इतर पदाधिकारी उपस्थित होते.