संत शिरोमणी श्री संत भीमा भोई जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर
25 मे रोजी मोफत भव्य आरोग्य शिबिर व भव्य मिरवणूक काढून साजरी करणार
जळगाव प्रतिनिधी: दि.12 भोई समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी जगद्गुरु श्री संत भीमा भोई यांची जयंती सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडते यावर्षी सुद्धा श्री बिजासनी भोईराज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्थेमार्फत मोठ्या उत्साहाने श्री संत भीमा भोई यांची जयंती 25 मे रोजी मोफत भव्य आरोग्य शिबिर व भव्य मिरवणूक काढून साजरी करणार आहे.या जयंतीनिमित्ताने वरिष्ठ सल्लागार समिती श्री.चुडामन भोई,शिवाजी भोई,गणेश भोई रणजीत भोई,संतोष जावरे,हर्षल भोई,सर्व वरिष्ठ यांच्या संगमताने व श्री बिजासनी भोईराज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या श्री संत भीमा भोई जयंती उत्सव समिती 2025 च्या अध्यक्षपदी योगेश चुडामन भोई,उपाध्यक्षपदी गिरीश घनश्याम भोई,सचिव पदी महेश हिरामण भोई,
खजिनदार स्मितेश जानकीराम जावरे व ऋषिकेश शिवाजी भोई यांची एक मताने निवड करण्यात आली या निवड प्रसंगी नितीन भोई,दुर्गेश भोई,गौरव भोई, कृष्णा जावरे,मुकेश जावरे,जीवन तायडे,विकी भोईटे,विपुल कोळी, गणेश सोनार,निखिल कोळी, दीपक सोनार व समाजाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…