ताज्या बातम्या

जळगामध्ये मसाज सेंटरला आला ऊत: मसाजच्या आड चालवतात वेश्याव्यवसाय, ते पण पर राज्यातील लोक

दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल व चार महिलांची सुटका करून त्यांची आशादीप वस्तीगृहात रवानगी.


जळगाव प्रतिनिधी : दि.18  जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील नयनतारा आर्केड मॉल स्पा सेंटर शॉप नं. ४०८ येथे स्पा सेंटरच्या नावाने गिऱ्हाईकांना  स्पा मसाज करणाऱ्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करण्यात येत असल्याबाबतची माहिती मिळाली होती स्थानिक पोलिसांना मिळाले होती. सदर मसाज पार्लर हे जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत असल्याने, सदरबाबतीत जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना कळवून सदर स्पा मसाज पार्लरवर बनावट ग्राहक पाठविण्यात आले होते. सदर बनावट ग्राहकास सदर स्पा सेंटरचा मॅनेजर राजु माधुजी जाट रा. कलोधिया तहसिल पिंपरी जि.भिलवाडा (राजस्थान ) याने बनावट ग्राहकास स्पा मसाज व्यतीरिक्त इतर सेवा देण्याची आमिष दिल्याने सदर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला ,सदर स्पा सेंटरचा मॅनेजर हा तिथे असलेल्या ०४ महिलांकडून स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करीत होता त्यास त्याचा मालक विक्रम राजपाल चंदमारी ढानी वय २० वर्ष, रा. वार्ड नं.०६ चत्तरगढ पत्ती जि.सिरसा हरीयाणा हा प्रोत्साहन देत होता म्हणुन त्यांच्या दोघांविरुध्द पिटा अॅक्ट प्रमाणे जळगाव शहर पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन ०४ पिडीत महिलांची सुटका करुन त्यांना आशादिप महिला वस्तीगृह जळगाव येथे रवानगी करण्यात आले आहे. सदर स्पा सेंटरचा मॅनेजर आरोपी राजु माधुजी जाट रा. कलोधिया ता पिंपरी जि भिलवाडा राजस्थान यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई हि पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी,जळगाव उपविभाग संदिप गावीत, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानीक गुन्हे शाखा जळगाव, पोलीस निरिक्षक , अनिल भवारी, सहा. पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोउपनिरिक्षक शरद बागल, पोलीस उपनि महेश घायतड, सहा. फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनिल पाटील, पोहवा/अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील महिला  पोउपनि वैशाली महाजन,  प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक दिपक चौधरी यांनी केली..


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button