मनपात ८०८ कर्मचाऱ्यांना १ कोटी १ लाख अग्रीम वाटप
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सण अग्रीमचे वाटप केले जाते. यंदा मनपाच्या तब्बल ८०८ कर्मचाऱ्यांनी अग्रीमची मागणी केली होती. त्यापोटी अर्थ विभागाने १ कोटी १ लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेआहेत.
अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी मार्च महिन्यातच मनपा आयुक्तांना निवेदन देऊन सण अग्रीम रक्कम देण्याची विनंती केली होती. त्यानुसार ९ एप्रिलपर्यंत ८०८ कर्मचाऱ्यांनी १२ हजार ५०० रुपये अग्रीम मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात सण अग्रीमची मागणी
झाल्याचे सांगण्यात आले. अग्रीमपोटी कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. दिवाळीप्रमाणेच आंबेडकर जयंतीला कर्मचाऱ्यांना पगारासोबत अतिरिक्त रक्कम उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अग्रीम रक्कम वाटप करण्यात आल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सालाबाद प्रमाणे एवढी मोठी रक्कम अग्रीम म्हणून वाटप करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी कर्मचाऱ्यांना सण दणक्यात साजरा करणे शक्य होणार असल्याचे महापालिकेच्या, युनियन अध्यक्ष अजय घेंगट कर्मचाऱ्यांतर्फे सांगण्यात येते आहे.