युवासेनेतर्फे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांना कॅरी ऑन व खेळाडूंच्या समस्यांविषयी निवेदन
- Loktime news : जळगाव युवासेनेतर्फे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांना कॅरी ऑन व खेळाडूंच्या समस्यांविषयी निवेदन
युवासेनेच्या वतीने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूडॉक्टर विजय माहेश्वरी यांना विविध विषयांना अनुसरून निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे, त्यासाठी विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३ – २०२४ मध्ये प्रथम वर्षाला प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते संपूर्ण विषयात प्रथम वर्ष अनुत्तीर्ण असले तरी त्यांना तृतीय वर्षात प्रवेश देता येईल असे महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविले आहे पण प्रथम वर्ष सर्व विषय पास असले तर तृतीय वर्षाला प्रवेश देता येईल असे नियम आहेत आम्ही सर्व पालक व विद्यार्थी यांच्याद्वारे आपणास निवेदन देतो की प्रथम वर्षाला एक विषयात कोणी विद्यार्थी नापास असेल तर अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये या कारणास्तव अशा विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाला प्रवेश मिळवून देण्यात यावा यासंदर्भात आग्रही मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली.
विद्यापीठातील जे काही खेळाडू विविध खेळात प्राविण्य पटकावून ते देशात आपले विद्यापीठाचे नेतृत्व करतात अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची नितांत गरज आहे असे प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले व त्यानंतर जे काही खेळाडू इतर राज्यात खेळायला जातात अशा खेळाडूंना रेल्वेत आरक्षण निश्चित करून मिळवण्यात यावे ज्यामुळे खेळाडूंचे प्रवासादरम्यान हाल होणार नाहीत व त्या खेळाडूंना पुरेसा आराम मिळेल ज्याने त्यांचे खेळावर लक्ष केंद्रित राहील. खेळाडूंना चांगल्या पद्धतीने मानधन देण्यात यावे व खेळाडूंच्या गुणवत्तेवर चांगले परिणाम होतील या दृष्टीने कार्य करण्यात यावे असे निवेदन कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांना देण्यात आले.
याप्रसंगी कुलगुरू डॉक्टर माहेश्वरी यांनी संपूर्ण मागण्यांचे सकारात्मक विचार करून, मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या वेळी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, नंदुरबार जिल्हा युवासेना विस्तारक तथा उपजिल्हायुवाधिकारी कुणाल कानकाटे, जिल्हायुवाधिकारी पियुष गांधी, युवासेना महानगर युवाधिकारी मनोज जाधव, तालुका युवाधिकारी गणेश चौधरी, युवासेना कॉलेज कक्ष युवाधिकारी प्रितम शिंदे आदी उपस्थित होते.