महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण विभाग व ठाणे शहर यांच्यावतीने पत्रकार मेळावा गुणगौरव सन्मान सोहळा व आरोग्य शिबीर
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री वसंत मुंडे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सकपाळे, प्रदेश सरचिटणीस श्री जगदीश सोनवने,प्रदेश समन्वयक श्री संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक व ठाणे शहर अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यात भव्य पत्रकार मेळावा आणि आरोग्य शिबिराचे १० एप्रिल २०२५ रोजी गुरूवारी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत टाऊन हॉल , कोर्ट नाका येथे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात दिलीप सपाटे यांची मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्ष पदी निवडी झाल्याबद्दल शुभेच्छा सत्कार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ अध्यक्ष मा. श्री दिलीप सपाटे, सहाय्यक संपादक दैनिक पुढारी मा. श्री चंदन शिरवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे मा. श्री रोहन घुगे,धडक कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अभिजीत राणे, भा. ज. पा आमदार ठाणे मा. श्री. संजय केळकर, माजी खासदार मा. श्री. संजीव नाईक, ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. नानजीभाई ठक्कर, एमसी एच आय क्रिडाईचे जितेंद्र मेहता, जनादेश संपादक मा. श्री कैलाश म्हापदी, उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे मा. श्री. पंकज शिरसाठ, काॅग्रेस ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण,RPI आठवले गट ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. भास्कर वाघमारे, टायटन मेडिसी हॉस्पिटल संचालक मा . श्री. अब्रार खान,भाजपा ठाणे उपाध्यक्ष मा. श्री. राजेश मढवी ,जिल्हामाहिती अधिकारी मा. श्री. मनोज सानप आदी मान्यवर उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.
या कार्यक्रमात ‘आधुनिक पत्रकारिता आणि गढूळ राजकरण’ या विषयांवर परिसंवाद सादर होईल. तसेच आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने पत्रकार बंधू भगिनी व नागरिकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या रेश्मा आरोटे, आरोग्यम धनसंपदा जितेंद्र पाटील, डॉक्टर दत्ता हरडे, परिवर्तन महिला व बाल विकास संस्था सोनिया गिल, लोकमतचे पत्रकार देवेंद्र जाधव, गोरखनाथ शिंदे, कुंदन सूर्यराव, डेमोक्रेटिक वेबपोर्टलचे अतुल तिवारी, सुरेखा पाटील, राजन पाटील, ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार सुभाष जैन, शैक्षणिक क्षेत्रातील मानाकंन संजय भोईर, डॉक्टर अशोक मेहता, सामाजिक उपक्रमांतील रोशन तांडेल, पत्रकार संदीप खर्डीकर, भीमराव शिरसाट, धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी, ठाणे नागरिकचे सतीशकुमार भावे, प्रणय शेलार, साम टिव्ही पत्रकार कांचन सोनावणे, ठाणे महानगरपालिकेच्या ज्योत्स्ना बांगर, प्रशाशकीय रतनसिंग चव्हाण , उद्योजक योगेश माळी, प्रशासकीय
दिनेश ठाकरे, सामाजिक निखिल भोईर, वैभव कदम, यज्ञेश बाबर, भूषण देवरे, सुर्वे मॅडम, भोंगळे मॅडम, अरूण बिराजदार यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला बहुसंख्येने पत्रकार बंधू यांनी उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन कार्यक्रमास येण्याचे आवाहन प्रदेश संघटक व ठाणे शहर अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे यांनी केले.