शेतकऱ्यांसाठी ऍग्री स्टॅक फार्मर आयडी कॅम्प उत्साहात साजरा.
तहसील कार्यालय जळगाव व तलाठी कार्यालय पिंप्राळा तर्फे आयोजित एक दिवसीय ऍग्री स्टॅक फार्मर आयडी कॅम्प उत्साहात साजरा,
दि. 26 जानेवारी 2025 रोजी पिंप्राळा येथे ऍग्री स्टॅक फार्मर आयडी चा एक दिवसीय कॅम्प तहसील कार्यालय तसेच पिंप्राळा तलाठी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आला. यात २०० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच या कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे तसेच जळगाव तहसीलदार शितल राजपूत, नायब तहसीलदार राहुल वाघ यांची खास उपस्थिती होती.
या कॅम्प मध्ये तहसीलदार राजपूत यांनी सर्व शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी त्वरित बनवून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या कॅम्पला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, पिंप्राळा तलाठी राजू बाऱ्हे, मंडळ अधिकारी
मारुडे व मालती चाफले सहाय्यक तलाठी पिंप्राळा, रवीना पवार सहाय्यक तलाठी पिंप्राळा,
राजेश वराडे कोतवाल पिंप्राळा, रितेश लाडवंजारी संजय अहिरे, तसेच आराध्या महा- ई सेवा केंद्राचे संचालक अमोल पढार, शेखर पढार, प्रेम बुंदे अली शेख, प्रशांत पोतदार, शमीर तडवी, दीपक देवरे, संकेत कोल्हे, दर्शन खैरनार, निलेश बडगुजर,धनराज ब्राह्मणे विशाल धनजे,आदींनी कॅम्प यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य दिले.