ताज्या बातम्या
जळगाव येथे बौद्ध समाज वधु वर परिचय मेळावा घेण्यात आला.
जळगाव प्रतिनिधी: दि. 23 जळगाव येथील गिरणा टाकी परिसरातील झोरास्तीयन हॉल येथे बौद्ध समाज वधु वर परिचय मेळावा घेण्यात आला.
सदर प्रसंगी डॉ अशोक सैदाणे यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून व बुद्ध चरणी फुले वाहून उद्घाटन करण्यात आले सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक सोनवणे, मिलिंद सुरवाडे,हरी सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन रामदास विरघट यांनी केले.कार्यक्रमास २८ नियोजित वधु वरांनी परिचय करून दिला.सदर कायक्रमाचे सुत्रसंचलन महेश तायडे आणि विवेक सैदाणे यांनी केले.