महाराष्ट्र
भयंकर रेल्वे दुर्घटना पाचोरा तालुक्यात रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांना उडवले; १० जण मृत
जळगाव : जिल्ह्यातील ता.पाचोरा परधाडे जळगाव कडून पाचोरा कडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस गाडीला आग लागल्याच्या भीतीने गाडीतून उड्या मारलेल्या प्रवाशांना समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची धडक बसल्याने मोठी भीषण दुर्घटना नुकताच घडली आहे. या घटनेत सुमारे दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना परधडे गावानजीक एका भोगीमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. यात अनेकांनी गाडीतून उड्या मारल्या पण समोरील ट्रॅकवर समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत अनेक प्रवासी हे चिरडले गेले. यात सुमारे १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. भुसावळ विभागातील रेल्वे वैद्यकीय पथक देखील घटनास्थळी रवाना झालेले आहेत.