जळगावातील अधिक्षक डाकघर येथे 06 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन
जळगाव,दि. 2 डिसेंबर- जळगाव क्षेत्र संबंधीत टपाल सेवेविषयी जळगाव विभाग, यांच्या मार्फत 06 डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या अदालतीत टपाल वस्तू, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, मनीऑर्डर, बचत बॅंक खाते या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. (उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुददा इत्यादी)
संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतीत ‘अधिक्षक डाकघर कार्यालय, पहिला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव ४२५००१ यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह 04 डिसेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जाईल, परंतु त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही. अशी माहिती अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.