राजकारण
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ललितकुमार रामकिशोर घोगले यांनी सुद्धा जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
वंचितचे जोरदार शक्तीप्रदर्शन ललित घोगले यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
जळगाव शहर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुती व महाविकास आघाडीकडून दंड थोपटले जात असताना वंचित बहुजन आघाडीही पूर्ण ताकदनिशी मैदानात उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ललितकुमार रामकिशोर घोगले यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.निळ्या झेंड्यासह काढण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शन रॅलीत हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व पुरुष सहभागी झाले होते. त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण जोर लावल्याचे चित्र आहे. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. स्टेडियम पासून या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते.