मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी जळगाव शहरांमधील भारत संचार निगम लिमिटेड च्या अधिकाऱ्याने केला मराठीचा अपमान
Loktime news: जळगाव प्रतिनिधी:
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी जळगाव शहरांमधील भारत संचार निगम लिमिटेड BSNL च्या अधिकाऱ्याने केला मराठीचा अपमान. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंबेडकर मार्केट जळगाव शहर मध्यवर्ती कार्यालय येथे फोन आला असता, त्या आधारावर बीएसएनएल मध्ये मनसे कार्यकर्ते यांनी चौकशी केली असता ,वेगळाच प्रकार समोर आला. बीएसएनएलचे महाप्रबंधक तेथील कर्मचारी आणि दुय्यम अधिकाऱ्यांवर हिंदी बोलत जा किंवा इंग्लिश मधून बोला, मराठी भाषा या ठिकाणी चालणार नाही, आणि मराठी पत्र सुद्धा चालणार नाही, अशा प्रकारचा दबाव अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांना आणत होते. आणि जर का कोणी मराठीतून पत्र लिहिलं तर त्याला धुडकावून लावत होते आणि इंग्लिश मधून लिहून आणा असा वारंवार कर्मचाऱ्यांवर सांगायचे,त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहराचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेले आणि त्यांना मराठीतून बोलण्यासाठी आम्ही प्रवृत्त केलं, त्याच्यावर पेनाची शाही टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला ,पण पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अधिकारी वाचले परंतु मनसेच्या स्टाईल मध्ये त्या अधिकाऱ्याला मराठीतून बोलण्यास भाग पाडले आणि तंबी दिली की जर उद्यापासून तू स्वतः मराठीत भाषेतून बोलला नाही आणि कोणाची जर अडवणूक केली तर तुम्हाला तुमचाच खुर्चीला बांधून ठेवून देऊ, असा इशारा दिला शेवटी महाप्रबंधक यांनी सर्वांसमोर माफी मागून त्यांना मी मराठीचा आदर आणि सन्मान करेल असे बोलले .
सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सोबत उपशहर सचिव खुशाल ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख हरिओम सूर्यवंशी, तालुका सचिव अनिल दिघे ,विभाग अध्यक्ष पवन सपकाळे, इस्माईल खाटीक ,राजू डोंगरे ,निलेश परदेशी, कमलेश डांबरे.आणि मनसैनिक उपस्थित होते.