चहेलम’ ऐवजी मुलींच्या मदरशात दान, पत्नीच्या विरहात मुस्लीम युवकाचा आदर्श
‘चहेलम’ ऐवजी मुलींच्या मदरशात दान,
पत्नीच्या विरहात मुस्लीम युवकाचा आदर्श
जळगाव दि.१ प्रतिनिधी* – ब्रेनहॅमरेज मुळे पत्नीचे अकस्मात मृत्यू झाले. आठ वर्षाचा अब्दुतला आणि मुलगी तस्मीया फातेमा आईच्या प्रेमाला पोरकी झाली. परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. पत्नी शिपता कौसर ही नेहमी पती समीर शेख यांना सामाजिक कार्यात प्रोत्साहन द्यायची. ज्याप्रमाणे हिंदू समाजात दशक्रिया विधी होतो त्याचप्रमाणे मुस्लीम धर्मीयांमध्ये ‘चहेलम’ होतो. एखाद्याच्या मृत्यू नंतर ४० दिवसानंतर हा विधी केला जातो. घराची परिस्थिती जेमतेम असताना ब्रेन हॅमरेजमुळे वैद्यकीय खर्च जुळवाजुळव करुन समीर शेख ने पत्नीला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत. मात्र त्यात त्याला यश आले नाही. उस्मानिया पार्क मधील समीर शेख प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो. समाजासाठी काही तरी करण्याची धडपड आणि पत्नीच्या आठवणी समीर ला स्वस्थ बसू देत नव्हत्या. यातूनच मास्टर कॉलनीमधील मदरसा जामिया आयेशा अमीरुल उलूम याठिकाणी जवळपास १४० मुली शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी मदत करता यावी म्हणून एक क्विंटल गहू, तांदूळ आणि तीन छताचे पंखे समीर शेखने दान केले. मौलाना अब्दुल हमीद यांनी ते स्वीकारले. याप्रसंगी फारुख शेख, सरफराज खान, अन्वर खान यासह समाजबांधव उपस्थित होते.