मन सुन्न करणारी घटना: पतीचा बीपी वाढल्याने पत्नी ने नेले पतीला रुग्णालयात आणि पत्नीला आला हृदयविकाराचा झटका..
दि.14 दुर्दैवी घटना: बीपी वाढल्याने पत्नी ने नेले पतीला दवाखान्यात आणि पत्नीला आला हृदयविकाराचा झटका..
जळगाव शहरातील जिल्हा परिषद बालविकास कार्यक्रमाधिकारी देवेंद्र राऊत यांच्या पत्नी महिला व बालकल्याण विभागात अधिक्षक पदावर असलेल्या मयुरी (करपे ) राऊत यांनी दि. 14 शनिवारी दुपारी पतीला बीपीचा जास्त त्रास होत असल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात नेले असता ,पतीची तब्येत जास्तच खराब असल्याचे बघत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्या जागीच कोसळल्या, यावेळी नातेवाईकांनी दुसऱ्या खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल केले, त्या ठिकाणी मयुरी देवेंद्र राऊत(करपे )यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला,तर पती देवेंद्र राऊत यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मयुरी यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे, शहरातील दादावाडी परिसरात ते वास्तव्यास आहे, घटना घडतात त्यांच्या परिसरातील नागरिकांनी व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली..