ताज्या बातम्या
ना. गिरीश महाजन यांना जामनेर शहरातील असंख्य महिलांनी बांधली राखी,
जामनेर येथे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा ऑनलाईन माध्यमातून संवाद कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास
असंख्य माता भगिनींनी उपस्थित राहून देवेंद्रजी फडणवीस यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि आज रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांना राखी बांधून आशीर्वाद दिले. यावेळी महाजन यांनी सर्व महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. हजारो महिलांनी राखी बांधताना लाडकी बहिण योजनेचे मानले आभार.