ताज्या बातम्या

जिल्ह्यात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह व महसूल पंधरवाडा ; विविध महसूली सेवांचा पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ


  1. loktime news : जिल्ह्यात 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह व महसूल पंधरवाडा ; विविध महसूली सेवांचा पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून कार्यक्रमाचा आराखडा जाहीर

जळगाव दि. 31 जिल्ह्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान ‘ महसूल सप्ताहाचे तर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘महसूल पंधरवाडा’ आयोजित करण्यात येणार आहे. या काळात विविध महसूली सेवांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थी, नागरिक यांना दिला जाणार असून त्या कार्यक्रमाची रूपरेषा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जाहीर केली आहे.

या रूपरेषेनुसार जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील भूमिका निर्णायक करण्यासाठी शासनाने ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ सुरु केली आहे. त्या योजनेच्या अनुषंगाने अधिकाधिक विशेष शिबीर आयोजित करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेवून पोर्टल व डेटा सेंटर सुरळीत राहिल, जेणे करुन सर्व अर्ज अपलोड करता येतील.

2 ऑगस्ट रोजी ‘ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासन निर्णय, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, दिनांक ०९.०७.२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ अधिकाधिक युवकांना प्राप्त व्हावा, त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड इ. आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात यावे त्यासाठी आवश्यतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात यावे.

3 ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली असून त्यात सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे व यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी शासन निर्णाय, सामाजिक न्याय विभाग, दिनांक १४.०७.२०२४ अन्वये ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्जदारांना राज्यांचे अधिवास प्रमाणपत्र / राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. सदर योजनेचा लाभ अधिकाधिक ज्येष्ठ नारिकांना प्राप्त व्हावा, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात यावे. त्यासाठी आवश्यतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात यावे. या योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाईल अॅप / सेतू सुविधा केंद्र न येथून भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त व्हावा त्यासाठी विशेष कक्ष आयोजित करुन अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात यावे.

सेतू केंद्र/ तहसिल कार्यालये इ. येथे उपस्थित राहणा-या ज्येष्ठ अ नागरिकांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना सौजन्याची वागणूक देण्याबाबत आणि त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याबाबत सर्व संबंधितांना सुचना द्याव्यात असे आदेशात नमूद केले आहे.

4 ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय ” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यात जिल्हास्तरावरील, तालुकास्तरावरील, मंडळ स्तरावरील व ग्रामस्तरावरील कार्यालयांची व परिसराची स साफसफाई करण्यात येणार आहे. कार्यालयाचे अभिलेख व दस्तऐवज यांचे वर्गीकरण व व्यवस्थापन, निंदणीकरण व महत्वाच्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग व म संगणकीकरण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित सेवा, यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, शुल्क, सक्षम प्राधिकारी इत्यादी माहिती दर्शविणारे फलक अद्यावत करावेत.

शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसिध्दीपत्रक स्वरुपात लाभार्थ्यांपर्यत पोहचवावी.शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या विभाग प्रमुख/कर्मचारी यांची नावे व संपर्क क्रमांक असलेले फलक व माहितीपुस्तके अद्यावत करण्यात यावीत

कार्यालयातील अनावश्यक फर्निचर, कागदपत्रे विहित कार्यपध्दत अवलंबुन दुरुस्त व आवश्यकतेनुसार नष्ट करावीत.असे निर्देश दिले आहेत.

दि. 5 ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”ही विशेष मोहिम राबविण्यात येईल.त्यात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले/प्रमाणपत्रे मिळण्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक त अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचा-यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात यावी. तसेच, संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांना घरासाठी/शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधुन संरक्षण दलातील कर्मचा- यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात यावेत. असे आदेश देण्यात आले आहेत.

6 ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा” हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल. त्यात राज्याच्या दिव्यांग व्यक्तींकरीता शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध योजना/उपक्रमांबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल.

शासनाच्या विविध विभागातील योजनांचा लाभ घेण्याकरीता आवश्यक असणा-या व महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले/प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल.

विविध योजनाअंतर्गत देण्यात येणा-या लाभांच्या अनुषंगाने स जिल्हा/तालुका स्तरावर शिबीर आयोजित करुन स्वयंसेवी संस्थांच्या व मदतीने उपकरणांचे वाटप करण्यात येईल.

अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय/निमशासकीय/शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने विशेष मोहिम राबविण्यात यावी. तसेच, या अनाथ मुलांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळण्याच्या अनुषंगाने या क्षेत्रात काम करणा-या सामाजिक संस्थांची आवश्यकतेनुसार मदत घेण्यात येईल.

७ ऑगस्ट रोजी “महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार वितरण व महसुल सप्ताह सांगता समारंभ ” आयोजित करण्यात येणार आहे.

1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या महसूल पंधरवाड्यात खालील कार्यक्रम करण्यात येतील.

“पुनर्वसन विषयक बाबी”, महसूल विषयक बाबी, कुळकायदा विषयक बाबी, गृह शाखा विषयक बाबी, टंचाई विषयक बाबी, भुसंपादन विषयक बाबी, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखा विषयक बाबी, आस्थापना विषयक बाबी यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button