जिजाऊ नगरात सारा फाउंडेशनतर्फे शिक्षक दिन साजरा – शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त
जळगाव प्रतिनिधी: गिरणा पंपिंग रोड जिजाऊ नगर, बुध्दविहार येथे सारा फाउंडेशन तर्फे शिक्षक दिनानिमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी सारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत भालेराव (डॉ.) यांच्या हस्ते उपस्थित सर्व शिक्षकांचा गुलाबाचे फूल, पेन व फाईल फोल्डर देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शिक्षकांमध्ये अरविंद बिऱ्हाडे, रवींद्र भालेराव, संजय सोनवणे, भास्कर दादा, विनोद सपकाळे, बापू साळुंखे, महेंद्र महसाने, बैसाने सर, लोखंडे सर, वानखेडे सर, मोरे सर, नितीन भाऊ सोनवणे, वाघ सर आदी मान्यवरांचा समावेश होता.
सत्कारानंतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “शिक्षक हा समाजातील दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षकाचे मार्गदर्शन हे सदैव महत्वाचे ठरते,” अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापू साळुंखे सर आणि विनोद सपकाळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी सारा फाउंडेशन तर्फे सर्व उपस्थित शिक्षकांचे आभार मानण्यात आले.