Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांची नुतन सहकारी पतपेढी आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : ४५ जणांवर गुन्हा, १६ आरोपी अटकेत 


प्रतिनिधी भुसावळ : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची नुतन सहकारी पतपेढी मर्यादीत, भुसावळ या संस्थेतील तब्बल ९.९० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संस्थेचे आजी-माजी संचालक मंडळ व कर्मचारी यांचा समावेश आहे.

संस्थेचा दिं. ०१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षण करताना लेखापरीक्षक प्रकाश चौधरी (वय ५८) यांच्या निदर्शनास मोठा गैरव्यवहार आल्याने त्यांनी तक्रार दाखल केली. या काळात पोटनियमबाह्य कर्ज वाटप, खोट्या सह्या, बनावट कर्जप्रकरणे, बनावट चेक (७२९) व बनावट सभासद (१७५) यांच्या माध्यमातून एकूण ₹९,९०,३४,७१९ रकमेची अफरातफर करण्यात आली होती.

त्यानुसार, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १७९/२०२५ भादंवि कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, २०१, १२०(ब), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याच्या गंभीरतेमुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रकरणाचा तपास अर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे वर्ग केला.

दिं. २८ जुलै २०२५ रोजी श्री. संदीप पाटील (पो.नि., आर्थिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली १६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना दुसऱ्या दिवशी २९ जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सुमारे २ तास युक्तीवादानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

श्री. संदीप पाटील, श्री. गणेश फड, श्रीमती शुभांगी पाटील, सफौ. दिनेश पाटील, पोहवा रतिलाल पवार, भरत जेठवे, निलेश सुर्यवंशी, समाधान पाटील, कपिल चौधरी, नापोशि ईश्वर धनगर, विजय शिरसाठ, पोशि दिलीप चव्हाण, दिपक गुंजाळ, दिपक पाटील, महेंद्र सोनवणे. गुन्ह्याचा पुढील तपास श्री. संदीप पाटील करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button