Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुधात भेसळ करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची आणि धरणगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

आपल्या घरी लहान मुलांना जर दूध प्यायला देत असाल तर सावधान व्हा, दूध भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करून घ्या


प्रतिनिधी जळगाव  30 जुलै:  जिल्ह्यात दुधात भेसळ करून मानवी शरीरासाठी अपायकारक दुध विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आणि धरणगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. भवरखेडा (ता. धरणगाव) येथील सोमनाथ आनंदा माळी (वय ३१) याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे किशोर साळुंखे यांच्या समवेत संयुक्त पथक रवाना केले. छाप्यामध्ये ३८ लिटर भेसळयुक्त दूध, ३८ लिटर मिश्रण, १.६ किलो रिफाइंड पाम करनल तेल आणि ४.५ किलो स्प्रे प्राईड पावडर आदी साहित्य जप्त करण्यात आले..साळुंखे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात धरणगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २७४, २७५, १२३, ३१८ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कलम २६(१), २७(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील व धरणगाव पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button