ताज्या बातम्याजळगाव

पाळधी–तरसोद बायपास रस्त्याची कामाची खासदार स्मिताताई वाघ यांच्या कडून पाहणी 


प्रतिनिधी जळगाव दि.19 :  शहराला वाहतूक कोंडीपासून दिलासा देणाऱ्या पाळधी–तरसोद बाह्यवळण (बायपास) रस्त्याच्या कामाची काल खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी संपूर्ण १८ किमी लांबीच्या कामांची सविस्तरपणे स्थळपाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सुरू असलेला हा महत्त्वाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून या पाहणीदरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अभियंते, प्रकल्प अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

खासदार स्मिताताई वाघ यांनी कामाच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेताना डांबरीकरणाची गुणवत्ता, रस्त्याची समतलता, पूल व कल्व्हर्टची रचना, ड्रेनेज व्यवस्था आणि रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक साइनज, गार्डरेल्स व रोड मार्किंग यांची तपासणी केली. काम ठरलेल्या वेळेत आणि उच्च दर्जात पूर्ण व्हावे, तसेच पाहणीदरम्यान रेल्वे क्रॉसिंगवरील उभारण्यात येणारा पूल व गिरणा नदीवरील पूल यांचीही पाहणी करण्यात आली. या दोन्ही पुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत व वाहतुकीसाठी सुरळीत खुली करावीत अजून चांगल्या पद्धतीने काम करून गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी संबंधित कंत्राटदार संस्था आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

या बायपास रस्त्यामुळे जळगाव शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. प्रवासाचा वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल आणि रस्त्यावरील सुरक्षा वाढेल. तसेच लांब पल्ल्याच्या मालवाहतूक वाहनांना थेट या मार्गाचा लाभ मिळून शहरातील रस्त्यांवरील दडपण कमी होणार आहे.

या वेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी NHAI अधिकाऱ्यांकडून प्रगती अहवाल घेतला आणि उर्वरित कामे जलद गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवण्याचे निर्देश दिले. नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ लवकर मिळावा यासाठी सर्व आवश्यक बाबींचा काटेकोर पाठपुरावा केला जाणार आहे.

या संपूर्ण दौऱ्यात प्रदेश उपाध्यक्ष भैरवीताई वाघ, खंडेराव अण्णानगर मंडळ अध्यक्ष मिलिंद चौधरी, गोपाल भंगाळे, संजय भोळे, सुदाम राजपूत, ललित बऱ्हाटे, तसेच एन.एच.ए.आय.चे अधिकारी शिवाजी पवार व संबंधित एजन्सीचे अभियंते उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button