ताज्या बातम्या

महावितरण कंपनीकडून स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा


जळगाव दि.16 :- महावितरण कंपनीकडून स्मार्ट मिटर बसविण्याची सक्ती मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातर्फे देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन कार्यकारी अधीक्षक यांना दि. १५ जुलै रोजी देण्यात आले आहे.

विद्युत महावितरण कंपनीकडून जळगांव शहरातील सर्व सामान्य नागरिकाच्या घरात बळजबरीने व सक्तीने पोष्टपेड स्मार्ट मिटर बसविण्यात येत असून राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुध्दा सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात या संदर्भातील प्रश्नांना उत्तर देतांना सांगितले की, पोष्ट पेड स्मार्ट मिटर बसविण्याची सर्वसामान्य जनतेवर कोणतीही सक्ती नाही. कोणाच्याही संमती विरुध्द बसविण्यात येत असल्यास गुन्हे दाखल करता येतील.परंतु मक्तेदाराकडील कर्मचारी सर्व सामान्य विज ग्राहकांवर सक्तीने व बळजबरीने स्मार्ट मिटर बसविण्यास भाग पाडत आहे व स्मार्ट मिटर न बसविल्यास जुन्या मिटरची रिडींग घ्यायला आम्ही येणार नाही अशी धमकी देतात.

सदर स्मार्ट मिटर बाबत अनेक राज्यात ते बसविण्यास विरोध होत असून मध्यप्रदेश, जबलपूर येथील रहिवाश्यांनी व विरोधी पक्ष कार्यकर्त्यानी पुराव्यासह दाखवून दिले की चेक मिटर द्वारे RECEIVE९८ युनीट वापर झालेला असतांना स्मार्ट मिटर प्रत्यक्ष ५९८ युनीट दाखविण्यात आले आहे. 

एका विशिष्ट उद्योगपतीचे खिसे सर्वसामान्य जनतेला लुटून भरण्यासाठी देशातील भाजप सरकारने मोदी शहा या जोडगाडीने स्मार्ट मिटर बसविण्याचे धोरण अवलंबविले आहे. ५ ते ६ हजार रुपये खर्च करुन बनविण्यात आलेले स्मार्ट मिटर हे १२ ते १५ हजार रुपये शासनाकडून घेऊन बसविण्यात येत असून सदर रक्कम सर्व सामान्य जनतेच्या खिश्यातून सुरक्षा अनामत व मीटर भाडे, मीटर शुल्क इ. नावाने उकळण्यात येऊ शकते. तसेच आता पोष्टपेड मीटर सांगण्यात येत असले तरी सदर स्मार्ट मिटर भविष्यात प्रीपेड मीटर मध्ये रुपांतरीत होऊ शकता तशी व्यवस्था त्या स्मार्ट मीटर मध्ये असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

तरी सदर स्मार्ट मीटर जनतेच्या जीवावर उठणारे व अन्यायकारक असल्याने जनतेची आर्थिक पिळवणूक करणारे ठरणार असल्याने स्मार्ट मिटर ‘बसविण्यात येऊ नये व ते बसविण्याकरिता सक्ती करण्यात येऊ नये.

अगोदर बसविण्यात आलेले मीटर ज्यांचे बिल २०० ते ३०० रु. दोन महिन्याचे येत होते त्यानंतर बदलविण्यात आलेल्या मीटरचे बील १२०० ते १३०० रुपये तेही एक महिन्याचे वाढलेले असतांना आता परत स्मार्ट मीटर पाच पट रिडींग जास्त दाखवत असल्याच्या तक्रारी देशभर असल्याने सर्वसामान्य ग्राहकाचे बील पाचपट म्हणजे ४००० ते ५००० रुपये तेही एक महिन्याचे येणार असल्याने स्मार्ट मीटर बसविण्याचा गोरखधंदा महावितरण कंपनीने थांबवावा, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, राजुभाऊ मोरे, संग्राम सुर्यवंशी, डॉ. रिझवान खाटीक, रिंकु चौधरी, आकाश हिवराळे, चेतन पवार नईम खाटीक, गोटु चौधरी यांच्यामार्फत देण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button