ताज्या बातम्या

अखेर श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करायला सुरुवात, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय जळगाव यांच्यामार्फत होणार.


जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी त मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षे बालकाच्या मृत्यू झाल्यामुळे मनपा प्रशासन अखेर जागे झाले . प्रशासन एखाद्या मोठ्या घटनेची वाट बघत असते का ? हे या प्रकरणामुळे दिसून आले. तुम्ही एक बळी द्या, त्यावेळी च आम्ही काम करू अशी प्रशासनाची अट असते की काय?

 ही घटना झाल्यावर बैठका, मिटींगा घेऊन, निविदा निघत नाही निघत तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कुत्र्यांची निर्बीजीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया होईपर्यंत संरक्षणम गो पशु सेवा संस्था जळगाव व नव समाज बहुउद्देशीय संस्था नंदुरबार या दोन्ही संस्थांना तात्पुरता स्वरूपात देखभाल व श्वानांवर निर्बीजीकरण करण्यास परवानगी दिलेली आहे. सदर श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय जळगाव यांच्यामार्फत करण्यात येत आहे. आज दि. 10 रोजी 3 श्वानांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना पाच दिवसांसाठी औषध उपचार करून व दोन वेळा खानपान व्यवस्था करून पूर्ववत ठिकाणी सोडण्यात येणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button