जळगाव मनपातील सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांचे कार्यालय कॅबिन काढून, उपायुक्त पंकज गोसावी यांना उपलब्ध करून द्यावी . सामाजिक कार्यकर्ता अनिल नाटेकर यांनी दिले आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना पत्र.
जळगाव प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग समिती 1ते 4 हे शहरातील मालमत्ता धारकांना विविध सुख सुविधाकरिता समिती कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तेथील प्रभागी समिती कार्यालयामध्ये शासन नियुक्त सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे ,त्यानुसार तेथील प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नियमाप्रमाणे त्याच प्रभाग समिती कार्यालयामध्ये उपस्थित राहणे, व कार्यालय स्थित ठेवणे क्रम पात्र आहे ,परंतु प्रभाग समिती क्रमांक 3 ला,अधिकारी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना मनपा तर्फे दरमहा 76 हजार पगार रुपये असून त्यांचे दालन मात्र मंत्राच्या केबिनला व आयुक्तांच्या कॅबिला लाजवेल अशी स्वतंत्र सुसज्ज आकर्षक, उत्तम फर्निचर व एसी युक्त केबिन,नियमात नसताना बनवले गेले आहे. तसा शासन निर्णय सुद्धा उपलब्ध नाही आहे.
सदर केबिनवर सुमारे तीन ते चार लाख रुपये खर्च मनपाकडून खर्च केल्याचे आढळले आहे . आणि दुसऱ्या बाजूला उपायुक्त पंकज गोसावी हे माळा क्रमांक 6 वर साध्या सिम्पल दालनात बसून कारभार पाहतात. तर 12 व्या मजल्यावर सहाय्यक आयुक्त चाटे यांच्या ताब्यात असलेली अलिशान केबिन तात्काळ काढून उपायुक्त पंकज गोसावी यांना उपलब्ध करून देण्यात यावी असे नाटेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच विवाह नोंदणी कार्यालय हे नानी बाई रुग्णालय येथून स्थलांतरित करून मजला क्रमांक 6 वर प्रशासकीय इमारतीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे पण त्यांनी सांगितले आहे.