जळगाव कारागृहात कैद्याचा खून.
जळगाव कारागृहात कैद्याचा खून.
भुसावळ येथील माजी नरसेवक रवींद्र खरात यांच्या खून प्रकरणात बंदिस्त असलेल्या असलेल्या आरोपींमध्ये अंतर्गत वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात ( वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळात अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आली होती. एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या भयंकर हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता. पुर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्या आरोपीने याने मोहसीन असगर खान ( वय ३४) याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.
जळगाव कारागृह हे आधी देखील अनेक गैरकृत्यांमुळे कायम चर्चेत असतांना आता थेट जेलमधील कैद्याचा खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कर्तव्यात कसूर करणार्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.
दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत असगर याचा मृतदेह हा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. तर पोलीसांनी जेलकडे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.