शहरात चक्क पत्रकाराच्या घरी भर दिवसा चोरी
घराचे कुलूप तोडून सोन्यासह चांदीचे दागिने व एक लाख रोकड लंपास
जळगाव शहरातील एका पत्रकाराच्या घरात भर दिवसा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्यासह चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना आज दिनांक १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ रस्त्यावर असलेल्या मायादेवी मंदिराच्या मागील बाजूला अरुंधती अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर पब्लिक लाईव्ह पोर्टलचे संपादक काशिनाथ चव्हाण हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास चव्हाण यांची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये गेले असता. अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ७ ग्राम वजनाची सोन्याची चैन तर ५ भारचे चांदीचे ब्रासलेट व ८५ हजारांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. यानंतर चव्हाण यांच्या पत्नी घरी पोहोचल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसताच. त्यांना चोरी झाल्याचे समजले त्यांनी लागलीच. रामानंद पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्यासह पोलीस पथक घटना घटनास्थळी दाखल झाले होते. शेवटचे वृत्त आती आले तेव्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.